Ad will apear here
Next
उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम
कोल्हापूर : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या ५७व्या वाढदिवसानिमित्त कोल्हापूर शहरात शिवसेनेच्या वतीने २७ जुलै रोजी विविध सामाजिक उपक्रम आयोजित करण्यात आले होते. 
ठाकरे यांचा वाढदिवस सामाजिक दृष्टीने साजरा करण्याचे आवाहन आमदार राजेश क्षीरसागर यांनी केले होते. त्यानुसार शहरात विविध ठिकाणी रक्तदान शिबिर, स्नेहभोजन, फळवाटप आदी सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. 

या उपक्रमांची सुरुवात श्री अंबाबाईला महाभिषेक करून करण्यात आली. या वेळी फेरीवाले सेनेचे शहरप्रमुख धनाजी दळवी, राजू पाटील, शिवसेना विभागप्रमुख गजानन भुर्के, सुनील भोसले, दिनेश साळोखे, राज अर्जुनीकर, विशाल बेलवलकर, श्रीकांत मांडलिक, विश्वनाथ पावसकर, कपिल सरनाईक, युवा सेना शहरप्रमुख पीयूष चव्हाण आदी शिवसैनिक उपस्थित होते.

त्यानंतर ऋतुराज राजेश क्षीरसागर यांच्या हस्ते व भगिनी मंच अध्यक्षा वैशाली राजेश क्षीरसागर यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवार पेठ येथील शिवसेनेचे शहर कार्यालय ‘शिवालय’ येथे रक्तदान शिबिराचे उद्घाटन पार पडले. या वेळी उपशहरप्रमुख अजित राडे, अनिल पाटील, उदय पोतदार, उदय पाटील, ओंकार परमणे, वाहतूक सेनेचे हर्षद पाटील, सौरभ कुलकर्णी, विजय रेळेकर आदी उपस्थित होते. शिवसेनेच्या कसबा बावडा विभागाने आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात उपशहरप्रमुख सुनील जाधव, दिनकर उलपे, संजय लाड, प्रकाश कोळी, राहुल माळी, कृष्णा लोंढे, सचिन पाटील, विद्यानंद थोरवत आदी उपस्थित होते.

 मंगळवार पेठ विभागाच्या वतीने मिरजकर तिकटी येथील अंधशाळेत रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. या वेळी उपशहरप्रमुख जयवंत हारुगले, रुपेश रोडे, गजानन भुर्के, किरण पाटील, भाई जाधव आदी उपस्थित होते.  शिवाजी पेठेतील उभा मारुती चौक येथील शिबिरात उपशहरप्रमुख तुकाराम साळोखे, रणजित जाधव, प्रशांत जगदाळे, शैलेश साळोखे, बंटी साळोखे, रूपेश इंगवले आदी उपस्थित होते. शुक्रवार पेठ विभागाने रहाट घाटगे तरुण मंडळ, शुक्रवार पेठ येथे आयोजित केलेल्या शिबिराला संजय गांधी योजनेचे अध्यक्ष किशोर घाटगे, सन्नी अतिग्रे, अनंत पाटील, सुरेश कदम, आदी उपस्थित होते. राजारामपुरीतील रक्तदान शिबिराला उपशहरप्रमुख विशाल देवकुळे, आझम जमादार, अश्विन शेळके, मंदार तपकिरे आदी उपस्थित होते. शाहूपुरीतील शिबिराला सागर घोरपडे, माथाडी कामगार सेना शहरप्रमुख राज जाधव आणि लाइन बझार येथे राजू काझी, सुहास डोंगरे उपस्थित होते. 

शिवसेना कर्मचारी सेना, वालावलकर कापड दुकान यांच्या वतीने वालावलकर कापड दुकान महाराणा प्रताप चौक येथे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. ज्येष्ठ शिवसैनिक दीपक गौड, शाखाप्रमुख सुनील निकम, प्रकाश दिवसे, सागर गिरी, अमोल लोखंडे आदी या वेळी उपस्थित होते. लक्ष्मीपुरी विभागाने बिंदू चौक येथे घेतलेल्या शिबिरात अजित गायकवाड, सुनील खोत, पूजा भोर, पूजा कामते, मुकुंद मोकाशी, अमोल बुढ्ढे आदी उपस्थित होते.

शिवसेना सीपीआर कर्मचारी सेनेच्या वतीने शाखाप्रमुख अनिल माने यांच्या हस्ते गोरगरीब रुग्णांना फळे वाटण्यात आली. युवा सेनेच्या वतीने मिरजकर तिकटी येथील अंधशाळेतील मुलांसाठी आणि लक्षतीर्थ विभागाच्या वतीने चंबुखडी येथील मातोश्री वृद्धाश्रमात स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी वृद्धाश्रम संस्थापिका वैशाली राजशेखर, शिवसेना उपशहरप्रमुख रमेश खाडे, विशाल कवाळे, राजू मोहिते, अमित सुतार, रतन पाटील, मनोज तपकिरे, सचिन भोळे आदी उपस्थित होते.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/WYZXBE
Similar Posts
शिवसेना पक्षप्रमुखांच्या वाढदिवसानिमित्त कोल्हापुरात विविध सामाजिक उपक्रम कोल्हापूर : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या ५६व्या वाढदिवसानिमित्त २७ जुलै रोजी शहर शिवसेनेतर्फे विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. राजकारणापेक्षा समाजकारण, नागरिकांच्या समस्यांसाठी शिवसेना नेहमी अग्रेसर राहते, याचा प्रत्यय सर्वसामान्य नागरिकांना वेळोवेळी आला आहे. शिवसेना पक्षप्रमुखांच्या
‘डीकेटीई’ला ‘बेस्ट ट्रेनिंग अ‍ॅंड प्लेसमेंट’ पुरस्कार प्रदान इचलकरंजी : येथील वस्त्रोद्योग आणि अभियांत्रिकी तसेच व्यवस्थापनशास्त्राचे अभ्यासक्रमाचे शिक्षण देणाऱ्या ‘डीकेटीई’ संस्थेला वर्ल्ड एज्युकेशन समिटमध्ये बेस्ट प्लेसमेंट अ‍ॅवॉर्डने सन्मानित करण्यात आले आहे. हा पुरस्कार ‘डीकेटीई’च्या वतीने एमबीए विभागप्रमुख प्रा. एस. आर. पाटील यांनी डॉ. रवी गुप्ता आणि कमिशनर डॉ
कमला महाविद्यालयामध्ये वृक्षारोपण कोल्हापूर  : पन्नास कोटी वृक्ष लागवडीच्या अंमलबजावणी कार्यक्रमाचा भाग म्हणून ‘रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर’च्या सहकार्याने येथील कमला महाविद्यालयातील विद्यार्थिनी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी वृक्षारोपण केले. या वेळी ताराराणी विद्यापीठाचे कार्यकारी अध्यक्ष डॉ. क्रांतिकुमार पाटील, रोटरीचे
पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या कोषाध्यक्षपदी क्षीरसागर कोल्हापूर : साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेल्या कोल्हापूर शहरातील श्री अंबाबाई देवीच्या देवस्थानासह पश्चिम महाराष्ट्रातील सुमारे तीन हजार ६७ मंदिरांचे व्यवस्थापन १९६९पासून महाराष्ट्र शासनाची ‘पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समिती’ पाहते. या देवस्थान समितीच्या कोषाध्यक्षपदी आमदार राजेश क्षीरसागर

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language